श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखने आयोजित केलेल्या स्वरचित कविता सादरीकरण स्पर्धेत २६ स्पर्धकांनी प्रत्येकी दोन कविता सादर केल्या. सर्वांनी दर्जेदार कविता सादर केल्या. तरुण तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेला हा काव्य वाचन कार्यक्रम तीन तास रंगला होता. या स्पर्धेत कु. श्रुती सागवेकर यांनी प्रथम क्रमांक, श्री. अगस्ती कुमठेकर याने द्वितीय क्रमांक, तर सौ. रेवती पंडित यांनी तृतीय क्रमांकाचा सन्मान पटकाविला. कु. केतन कदम, सौ. स्वाती गोडे, श्री. विनय होडे, सौ. अनुप्रिता मुळ्ये आणि कु.प्रगती शिंदे यांची उत्तेजनार्थ निवड करण्यात आली.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. गायत्री जोशी आणि प्रा. स्वप्ना पुरोहित यांनी काम पाहिले. वाचनालयात शनिवार, दि. १५ फेब्रुवारी,२०२५ रोजी सायंकाळी श्री. मिलिंद मेहेंदळे, पुणे आणि श्री. अवधूत पटवर्धन, मुंबई यांचा कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचेवेळी या काव्यवाचन स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
सर्व विजेत्यांचे, वाचनालयाचे पदाधिकारी, परीक्षक आणि उपस्थित सर्वांनी अभिनंदन केले.
फोटो- यशस्वी स्पर्धकांसह अध्यक्ष प्रा. जोशी आणि वाचनालयाचे पदाधिकारी.
छाया- अमृता इंदूलकर