बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने सत्तेच्या विरोधात लढणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे रहावे अन्यथा भविष्यात जनतेचा आवाज उठवण्यासाठी विरोधकच नसतील – सुहास खंडागळे.


रत्नागिरी:-आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्यातील जनता सत्तेच्या विरोधात जनहितासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही तर भविष्यात जनतेचा आवाज उठवण्यासाठी विरोधकच शिल्लक नसतील. यात सर्वाधिक नुकसान सामान्य जनतेचे होईल, याची नोंद आजच्या तरुण पिढीने घ्यावी असे स्पष्ट मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी सत्तालोभी राजकारणावर बोलताना व्यक्त केले आहे.

             सत्तेत असणाऱ्या बलाढ्य राजकीय पक्षाच्या नेत्यांवर जनतेचा दबाव गट हवा,असं जनतेला वाटत असेल तर जनहिताच्या मुद्द्यावर लढणाऱ्या विरोधकांना जनतेने साथ द्यायला हवी. असे आगामी काळात न झाल्यास जनतेचा आवाज उठवणारे विरोधकच शिल्लक राहणार नाहीत. याचा सर्वात जास्त फटका सामान्य जनतेला बसेल. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे विरोधकांकडून हळूहळू कमी होईल.सत्तालोभी राजकारणाचा फटका हा जनतेला बसेल. परिणामी जनतेने लोकांचे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे रहावं आणि सत्तेत बसलेल्या लोकांकडून काम करून घ्यावीत असे स्पष्ट मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी या विषयावर बोलताना व्यक्त केले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना असंख्य प्रश्न भेडसावत आहेत पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी, एमआयडीसी विकास त्याचबरोबर शेती क्षेत्रातील समस्या असे अनेक प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. या प्रश्नांची उत्तरं सत्ताधारी लोकांकडून जनतेला हवी असल्यास सत्ताधाऱ्यांवर जनतेचा दबाव असणे गरजेचे आहे.विरोधी पक्ष खंबीर नसेल तर जनतेचा आवाज शासन दरबारी कोण पोहोचवेल? असा प्रश्नही खंडागळे यांनी उपस्थित केला असून सर्वसामान्य जनतेने आगामी काळात विकासाच्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी दबाव गट म्हणून जनहिताचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांच्या पाठी उभे राहावे असे आवाहन सुहास खंडागळे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सामान्य जनतेला व तरुणांना केले आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!