बातम्या

भाजप महिला मोर्चा रत्नागिरी द. तर्फे आंबेड बु. येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.

आंबेड : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी द. तर्फे संगमेश्वर तालुक्यातील शिगवणवाडी आंबेड बु. येथे जागतिक महिला दिन महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रदेश सचिव सौं. शिल्पाताई मराठे व जिल्हाध्यक्षा सौं. वर्षाताई ढेकणे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायत सदस्या तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. नुपुरा मुळ्ये, ग्रामपंचायत सदस्य, भाजपा संगमेश्वर द. तालुका उपाध्यक्ष श्री. राजेश आंबेकर, सौ. सरिता आंबेकर यांच्या प्रयत्नांनी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणाऱ्या सौ. सुचिता ढेकणे यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हिंमतीने प्रयत्न करणाऱ्या सर्व महिलांचे अभिनंदन केले. आपले घर सांभाळून व्यवसाय कसा चालवायचा याबाबत उद्बोधन केले. यातूनच समाजात ‘स्त्री’चे स्थान दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला.
              भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी द. अध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे म्हणाल्या, “मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान झाल्या दिवसापासून त्यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवून कल्याणकारी योजना राबवण्याचा प्रयत्न केला. जन-धन खाते, प्रधानमंत्री घरकुल योजना, उज्ज्वला योजना, ड्रोन दीदी, लखपती दीदी अशा अनेक योजना कार्यान्वित करून खऱ्या अर्थाने महिलांना सन्मान प्राप्त करून दिला. याशिवाय बचत गट, लघु उद्योग आदी क्षेत्रांमध्ये शासकीय योजनांचा लाभ घेऊन कित्येक महिलांनी आपल्या कुटुंबाला आधार दिला आहे. शेवटी, आपण प्रयत्न केला तर यशस्वी होऊच हा विश्वास मनात ठेवून कामाला सुरुवात तर केली पाहिजे. यासाठी या महिला दिनाच्या निमित्ताने एकजुटीने स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करूया.” या कार्यक्रमासाठी संगमेश्वर उ. महिला मोर्चा तालुका अध्यक्षा सौ. शीतल दिंडे, सौ. सुमन झगडे, सौ. प्रियंका साळवी, ग्रा.पं. सदस्या सौ. पूजा मोहिते, सदस्या सौ. साक्षी शिगवण व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सीआरपी सौ. मेघना मोहिते, सौ. अरुणा जाधव, आशासेविका सौ. जया गुरव, अंगणवाडी सेविका सौ. सरिता गुरव, वाडीप्रमुख सौ. अपर्णा शिगवण, सौ. कविता टाकळे, सौ. दिक्षा गुरव आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.   दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!