समिर शिरवडकर-रत्नागिरी.
राजापूर:- वीजवितरण विभागाकडून तालुक्यामध्ये नादुरुस्त मीटर बदलण्याच्या नावाखाली स्मार्ट मीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे, यासाठी तालुक्यातील काही पक्षाच्या नेते मंडळीने आक्षेप घेतला घेऊन काही मागण्या सुद्धा महावितरण विभागाकडे निवेदन,देउन तर आंदोलने करू अश्या प्रकारच्या पत्रानुसार केल्या होत्या.त्याला महावितरण करून हरताळ मिळाल्याचे समजते.याचाच अर्थ नेते किव्हा लोकप्रतिनिधी फक्त निवेदन देऊन गप्प बसतात असाच होतो.परंतू महावितरण आणि ठेकेदार आपले काम सुरळीतपणे करत करतो,याचाच एक भाग म्हणजे राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत दळे मधील काही गावात,तर ग्रामपंचायत जैतापूर मधील काही गावात हे स्मार्ट मीटर बसवले असल्याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडुन मिळते.
जुन्या आणि फॉल्टी मीटर च्या नवाखाली होळी गावात जवळपास १५ तर जैतापूर गावात २५ मीटर बसविल्या ची माहिती आहे,ग्रामपंचायत मध्ये याची माहिती किव्हा या विषयी ग्रामसभा झाली वा कसे हा देखील प्रश्न निरुत्तरित आहे.जुन्या आणि फोल्टी मीटर च्या नावाखाली अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन यादी काढून महावितरण च्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मदतीनें अक्षरशः लोकांची दिशाभूल करून आणि चुकीची माहीती देऊन स्मार्ट मीटर बसविणेत येत आहेत,अनेक राज्यात या स्मार्ट मीटर बाबत आंदोलने होत आहेत,महाराष्ट्रात सुध्दा आंदोलने निदर्शने सुरू आहेतच. याबाबत शासन काय ठोस भूमिका घेणार याकडं लक्ष आहे.
महावितरणच्या हेड ऑफिस मधून तसे आम्हाला निर्देश आहेत, तालुक्यातील निवेदनावर अजून तर काही झाले नाही तशी वरिष्ठाकडुन माहिती आली नाही : महावितरण अधिकारी – राजापूर -पडवे