रत्नागिरी : कोकणात सह्याद्री पर्वताच्या द-याखो-यात वसलेल्या धनगरवाड्यांच्या विकासाला वरदान असणारी, ” वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजना या योजनेत यापुर्वीच्या जिआर नुसार लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची अल्प तरतूद असल्यामुळे या योजनेचा परीपुर्ण फायदा धनगरवाड्यांना होत नव्हता.
धनगरवाड्यांना लोकसंख्येची अट शिथिल करुन अनुदानात वाढ करावी यासाठी मागील तीन वर्षांपासुन, “महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी” या संघटनेतर्फे शासन दरबारी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरु होता.संघटनेच्या पाठपुराव्याची दखल मागील मा उद्धवजी ठाकरे सरकारने घेतली होती.वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेचा सुधारीत जिआर दिनांक 30 मे 2022 या तारखेचा आहे.यामुळे या कामाचे श्रेय मा उध्वजी ठाकरे सरकारलाच जाते.
दिनांक 30 मे 2022 च्या सुधारीत जिआर नुसार या योजनेच्या फायद्याच्या बाजू खालील प्रमाणे आहेत.
1) यापुर्वी 51 ते 100 लोकसंख्या असणाऱ्या वाड्यांना विकास कामासाठी फक्त रू 4 लाखाची तरतूद होती तेथे आता रु 15 लाखाची तरतूद करण्यात आली आहे.
2) यापुर्वी 101 ते 150 लोकसंख्या असणाऱ्या वाड्यांना विकास कामासाठी फक्त रु 6 लाखाची तरतूद करण्यात आली होती तेथे आता रु 20 लाख मिळणार आहेत.
3) यापुर्वी 151 च्या पुढे लोकसंख्या असणाऱ्या वाड्यांना विकास कामांसाठी फक्त रु 10 लाखाची तरतूद होती तेथे आता लोकसंख्या 151 ते 300 लोकसंख्या असणाऱ्या वाड्यांना रु 25 लाख मिळणार आहेत.
4) सुधारीत जिआर मध्ये बहुसंख्येने भटक्या विमुक्त समाजांची लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये संत रामराव महाराज सभागृह/समाजमंदिर बांधण्यासाठी रु 25 लाखाची तरतूद केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात धनगरवाड्या व अन्य भटक्या विमुक्त समाज वाड्यांवर मोठ्या प्रमाणात संत रामराव महाराज सभागृह/समाजमंदिर मोठ्या प्रमाणात होतील.
विद्यमान सरकारने दिनांक 30 मे 2022 च्या वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेच्या सुधारीत जिआर ची अमलबजावणी करण्याचे आदेश सबंधित प्रशासकीय विभागांना दिल्यामुळे कोकणातील धनगर समाज व अन्य सहयोगी भटक्या विमुक्त समाजांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे मत रामचंद्र बाबू आखाडे, जिल्हाध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी यांनी व्यक्त केले.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*

धनत्रयोदशीच्या व दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक : श्री. नितीन जाधव.
(भाजपा शहर उपाध्यक्ष रत्नागिरी. प्रभाग क्र.१)

शुभेच्छुक : पंकज मारुती पुसाळकर
प्रभाग क्रमांक सात कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी