बातम्या

खान्देश,विदर्भ ते कोकण प्रांत जोडणारी ही गाडी आता ०१ जानेवारी २०२३ पर्यंत धावणार.

नागपूर जंक्शन ते मडगाव गोवा दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली खान्देश,विदर्भ ते कोकण प्रांत जोडणारी ही गाडी आता ०१ जानेवारी २०२३ पर्यंत धावणार आहे. विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. गणेशोत्सव व दिपावलीच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव गोवा (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी ऑक्टोबर अखेरपर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, या गाडीची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी ०१ जानेवारी २०२३ पर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर जंक्शन ते मडगाव गोवा पर्यंत चालवली जाणार आहे. त्यानुसार ही गाडी नागपूर जंक्शन येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी ०३ वाजुन ०५ मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगाव गोवाला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०५ वाजता पोहोचेल.
मडगाव गोवा ते नागपूर जंक्शन दरम्यान धावताना ही गाडी (०११४०) गुरुवार तसेच रविवारी मडगाव गोवा येथून रात्री ०८.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९.३० वाजता ते नागपूर जंक्शनला पोहोचेल.मडगाव गोवा ते नागपूर जंक्शन दरम्यान धावताना ही गाडी (०११४०) गुरुवार तसेच रविवारी मडगाव गोवा येथून रात्री ०८.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता ते नागपूर जंक्शनला पोहोचेल.
नागपूर जंक्शन ते मडगाव गोवा या प्रवासात गाडी वर्धा जं, पुलगाव, धामणगाव बडनेरा जं, अकोला जं,मलकापूर, भुसावळ जं, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण जं, पनवेल जं, रोहा,माणगाव, खेड, चिपळूण,संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थीवीम, तसेच करमाळी गोवा या स्थानकांवर थांबणार आहे. दोन महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून ३७ फेऱ्या होणार आहेत तसेच या रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण inquiry.indianrail.gov.in,irctc.gov.in व आरक्षण खिडकीवर २३ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे
नागपूर मडगाव गोवा प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष सुनिल उत्तेकर,पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष यशवंत परब,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शबनम शेख,राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले,राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगांवकर,राष्ट्रीय संपर्कप्रमुख हर्षद भगत,दापोली तालुकाध्यक्ष नागेश मयेकर,मंडणगड तालुकाध्यक्ष संदेश गांधी,प्रवासी सुधिर राठोड,दिपक सोनवणे,गजानन राठोड,विदर्भ खान्देश विद्यार्थी-विद्यार्थीनी प्राध्यापक प्राचार्य शिक्षक-शिक्षिका आदिनी केले आहेत. दखल न्यूज महाराष्ट्र..

जाहिरात..
जाहिरात…
दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक : श्री. नितीन जाधव.
(भाजपा शहर उपाध्यक्ष रत्नागिरी. प्रभाग क्र.१)

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!