टॉप न्यूज

चिपळूण मधील सहाय्यक दुय्यम निबंधक (श्रेणी १) श्री. प्रशांत धोत्रे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात..

भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताहमध्येच अधिकारी जाळ्यात; लाच लुचपत विभागाची कामगिरी..

चिपळूण : चिपळूण मधील सहाय्यक दुय्यम निबंधक (श्रेणी १) श्री. प्रशांत धोत्रे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले असून अवघ्या आठ दिवसांपूर्वी यांची नियुक्ती झाली होती. लाच लुचपत विभागाने यशस्वी सापळा रचत रत्नागिरी युनिटने ही कारवाई केली आहे. तक्रारदार हे  पुरुष वय 34 वर्षें, तर आरोपी – 1. प्रशांत रघुनाथ धोत्रे वय ४३ वर्षे दुय्यम निबंधक श्रेणी 1, दस्त नोंदणी विभाग ता. चिपळूण जि. रत्नागिरी 2. अरविंद बबन पडवेकर वय 56 खाजगी इसम रा. मुरादपूर ता. चिपळूण जि.रत्नागिरी या प्रकरणात लाचेची मागणी 10,000 /- रुपये, होती तर लाच 7,000 / रुपये स्विकारली या प्रकरणात हस्तगत रक्कम-7000/-रुपये लाचेची मागणी ही ता. 02/11/2022 रोजी करण्यात आली होती. प्रत्यक्षात लाच स्विकारली त्याच दिवशी 02/11/2022 रोजी
       तक्रारदार  हे व्यवसायाने वकील आहेत. पक्षकार यांचे खरेदीखत व हक्क सोड नोंदणी करिता लोकसेवक प्रशांत धोत्रे, दुय्यम निबंधक, चिपळूण यांनी 10000/- रुपये लाच रकमेची मागणी केली म्हणून तक्रारदार यांनी तक्रार दिलेली होती. सदर तक्रारीची दि. 02/11/2022 रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता नमूद लोकसेवक यांनी  केलेल्या दस्त नोंदणीचे 4500/-रुपये व यापूर्वी केलेल्या नोंदणीचे काय होतील ते राऊंड फिगर अशी लाच रकमेची मागणी केलेली असून त्याप्रमाणे लाच रक्कम 7000/-रुपये आज दिनांक 02/11/2022 रोजी खाजगी ईसम अरविंद पडवेकर यांनी लोकसेवक प्रशांत धोत्रे यांचे सांगण्यावरून दुय्यम निबंधक कार्यालय चिपळूण येथे लाच स्वीकारल्यानंतर त्यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आलेले आहे. पुढील कारवाई चालू आहे.       
           या प्रकरणी श्री. अनंत कांबळे*,पोलिस निरीक्षक,लाप्रवि रत्नागिरी पोह/संतोष कोळेकर, पोना/दिपक आंबेकर,  पोशि/ हेमंत पवार, चापोशी  प्रशांत कांबळे. पर्यवेक्षक अधिकारी श्री. सुशांत चव्हाण, पोलीस उप अधीक्षक, ACB रत्नागिरी यांनी ही कारवाई यशस्वी केली.
        या टीमला मार्गदर्शन अधिकारी म्हणून मा.श्री. पंजाबराव उगले सो, अपर पोलिस आयुक्त, ठाणे पोलिस आयुक्तालय,  (पोलिस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र ,अतिरिक्त कार्यभार) २.श्री अनिल घेरडीकर सो, अपर पोलीस अधीक्षक,  एसीबी ठाणे परिक्षेत्र, आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी-
मा. सह जिल्हा निबंधक,वर्ग 1, रत्नागिरी.. यांनी काम पाहिले.
       भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताह निमित्ताने पर्यवेक्षक अधिकारी श्री. सुशांत चव्हाण, पोलीस उप अधीक्षक, ACB रत्नागिरी यांनी आव्हाहन केली की आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.
संपर्क :-
१)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
रत्नागिरी कार्यालय फोन नं. 02352- 222893
२) श्री सुशांत चव्हाण, DYSP , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी* मो.नं.9823233044
३) श्री प्रविण ताटे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो. नं. 8055034343
4) श्री अनंत कांबळे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो.न. 7507417072
३) टोल फ्री:- १०६४
चला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करू. *दखल न्यूज महाराष्ट्र.*

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!