देवरुख
: शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा. सागर शांताराम पवार यांची संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ यांनी मुंबई विद्यापीठाच्या खो-खो (महिला) संघाच्या व्यवस्थापकपदी निवड केली आहे. मुंबई विद्यापीठ खो-खो (महिला) संघ पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ खो-खो (महिला) स्पर्धा: २०२२-२३ चे आयोजन डॉक्टर हरीसिंग गौर विश्वविद्यालय, सागर (मध्य प्रदेश) येथे करण्यात आले आहे. या स्पर्धा दिनांक ७ ते १० नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत संपन्न होणार आहेत. यावर्षी प्रा. सागर पवार यांनी मुंबई विद्यापीठ कोकण विभागीय संघाचे व्यवस्थापकपद भूषविले होते. प्रा. सागर पवार यांच्या निवडीबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दखल न्यूज महाराष्ट्र.