अध्यात्म/राशी भविष्य

राशी भविष्य(१० नोव्हेंबर २०२२)दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्यामुळे आपण काहीसे तणावात राहाल. आर्थिक समस्या काही अंशी जाणवू शकते. एखाद्या देवळात किंवा धार्मिक स्थळी जाऊन आज आपण आपला वेळ घालवाल.
➡️ वृषभ : बाहेरील पदार्थ खाणे टाळा. चुकीचे काहीतरी खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता. जवळचे मित्र आज तुमच्याशी नाराज होऊ शकतात. नवीन योजना तयार करा; आणि त्यावर काम करणे सुरू करा. जीवनसाथी आज तुम्हाला काहीतरी सरप्राईज देऊ शकतो.
➡️ ​मिथुन : आरोग्य उत्तम राहणार आहे. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. तुम्ही मेहनत घेतली तर धनलाभ होईल. मानसन्मान मिळेल.
➡️ कर्क : आज तुमचे वागणे चांगलेच असले पाहिजे. आज तुमच्याकडे पैसा चांगला असेल. प्रेम संबंध याबाबतीत आजचा दिवस चांगला आहे. घरातील व्यक्तींची साथ मिळेल.
➡️ सिंह : व्यायामाकडे लक्ष द्या. जुगार सत्तेबाजी यापासून लांब राहा. अभ्यासाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिलेच पाहिजे. रिकाम्यावेळी आपल्या आनंदासाठी काम करा.
➡️ कन्या : आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. आज तुमचा दिवस ऊर्जावान असणारा असणार आहे. आज तुमच्या शब्दाला मान आहे.
➡️ तुळ : एखाद्या चांगल्या कामात स्वतःला व्यस्त ठेवणे योग्य राहील. आर्थिक बाजू मजबूत राहणार आहे. महत्त्वाच्या आणि मनातील विषयावर आज घरातल्या व्यक्तींशी आपण चर्चा करू शकता. जीवनसाथीची उत्तम साथ मिळेल.
➡️वृश्चिक : आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मित्रमंडळींबरोबर आज आनंदात राहाल. वृश्चिक महिलांसाठी आजचा दिवस खास असणार आहे.
➡️धनु : पोटाचे विकार दाताचे समस्या जाणवू शकते, वैद्यकीय सल्ला घ्या. आज काही कामासाठी खर्च होऊ शकतो. प्रवास घडू शकतो. आज कोणावरही रागवणे टाळा.
➡️ मकर : गर्भवती महिलांनी आज सावधगिरीने वागले पाहिजे. आर्थिक बाजू मजबूत होईल. आर्थिक येणे असेल तर आज मिळू शकते. फायद्यासाठी केलेला प्रवास आज फायदेशीर ठरणार आहे.
➡️ कुंभ : आज तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. झटपट पैसे कमावण्याच्या नादात तुम्ही आर्थिक नुकसान करू शकता हे देखील लक्षात ठेवा. आज कोणी खास व्यक्ती मिळण्याचे योग आहेत.
➡️ मीन : आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक समस्या जाणवू शकते. आज तुम्ही जेष्ठ मंडळींचा सल्ला घेऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या आयुष्याची जोडीदार मिळू शकते.      
▶️ *दखल न्यूज महाराष्ट्.*

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!