देवरुख : श्री क्षेत्र मार्लेश्वर दशक्रोशीतील ग्रामस्थांनी भाजपा युवा मोर्चा (रत्नागिरी द.) चे जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेश कदम यांच्या नेतृत्वाखाली उभ्या केलेल्या अपूर्व लढ्याला अखेर यश प्राप्त झाले. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रविंद्र चव्हाण साहेब व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. शेखर निकम साहेब यांनी नागरिकांच्या अडचणी लक्षात घेत या कामाला गती प्राप्त करून दिली. याचाच परिणाम म्हणुन भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युती शासनाने या रस्त्याच्या कामासाठी अंदाजपत्रकात सुमारे २ कोटी ४० लाख एवढी भक्कम तरतूद उपलब्ध करून दिली.
देवरुख-मार्लेश्वर मार्गावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत गुणवत्तापूर्ण करण्यात यावे याबाबत मा. मंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांनी निर्देश दिले आहेत. देवरूखपासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेमध्ये स्वयंभू मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. श्री देव मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी व येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी देशभरातून प्रतिदिन हजारो भाविक, पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या संख्येत घट झाली होती. आता रस्त्याचे काम झाले की पूर्ववत सगळे सुरू होणार असल्याचा आनंद सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केला. सर्वांच्या वतीने रूपेश कदम यांनी मा. मंत्री रविंद्र चव्हाण साहेब, आमदार शेखरजी निकम, भाजपा जिल्हाध्यक्ष (रत्नागिरी द.) ॲड. दिपकजी पटवर्धन यांचे मनस्वी आभार व्यक्त केले.
▶️ *दखल न्यूज महाराष्ट्र.*