“रत्नागिरीत राजकीय दडपशाहीचा “सिंधुदुर्ग मॉडेल” कदापि माजू देणार नाही.”– श्री ज्योतिप्रभा पाटील
रत्नागिरी : गुरुवार दि १० नोव्हेंबर रोजी नदीम सोलकर मारहाण प्रकरणी आम आदमी पार्टी रत्नागिरीचे जिल्हा संयोजक श्री ज्योतिप्रभा पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मा.सरन्यायाधिशांना भारतीय राज्यघटनेतील कलम २२६ अंतर्गत, माजी पंचायत समिती सदस्य श्री.नदीम सोलकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती देत, स्वदखल कारवाईची मागणी केली असून, राज्याच्या पोलिस महासचालकांना व पोलिस यंत्रणेला या बाबत कळवले आहे, आणि या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत, तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
याचिकेत श्री पाटील यांनी असे म्हटले आहे की “ही घटना रत्नागिरीच्या लोकशाही अखंडतेला तडा देणारी एक गंभीर बाब असून, या घटनेला घडून जवळपास एक आठवडा उलटून गेला आहे, आणि हल्ला झालेल्या पीडितेने या सार्वजनिक हिंसाचाराच्या गुन्हेगारांवर कोणतेही कारवाई केली नाही, किंवा पोलिसांनी हस्तक्षेप करून या गंभीर दखलपात्र गुन्ह्यांची दखल घेतली नाही.” श्री.पाटील यांनी याचिकेत असेही नमूद केले आहे की, “जोपर्यंत या सार्वजनिक हिंसाचाराचे गुन्हेगार आणि त्यांना प्रवृत्त करणारे राजकीय घटक मोकाट फिरत आहेत, तोपर्यंत रत्नागिरीतील नागरिकांचे राजकीय स्वातंत्र्य धोक्यात आहे.”
*दखल न्यूज महाराष्ट्र.*