बातम्या

श्री देवी जुगाई क्रीडा मंडळ, कोसुंबच्यावतीने जिल्हा कुमार व कुमारी कबड्डी स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : जिल्हा संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ४९वी कुमार व कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा रविवार दि.२० नोव्हेंबर, २०२२ रोजी श्री देवी जुगाई क्रीडा मंडळ, कोसुंब संगमेश्वर यांच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा कोसुंब येथील मेन स्टॉप लगतच्या क्रीडांगणावर संपन्न होणार आहे. जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेकरता प्रत्येक तालुका कबड्डी असोसिएशनमधून प्रत्येक गटातून (कुमार मुले/मुली) प्रत्येकी दोन संघ पात्र ठरतील. जिल्हा असोसिएशनने दिलेल्या स्पर्धा कार्यक्रम पत्रिकेनुसार सामने सकाळी ठीक ९:०० वाजता सुरू होतील. वेळेवर स्पर्धा सुरू होण्याकरता सर्व तालुका संघांनी सकाळी ठीक ८:०० वाजता स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी कुमार/कुमारी वय २० वर्षे (०१/०१/२००३ पासून जन्मलेले) कुमार गट मुले वजन ७० किलो, तर मुलींचे वजन ६५ किलो असणाऱ्या खेळाडूंमधून रत्नागिरी जिल्ह्याचा कुमार/ कुमारी संघ निवडला जाणार आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंसाठी आधार कार्ड, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१०वी/१२वी बोर्ड सर्टिफिकेट), जन्म प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. बोनाफाईड प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही, खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या खेळाडू, संस्था, तालुका संघटना अथवा शाळेवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा समजून कारवाई होऊ शकते याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यावी अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
श्री देवी जुगाई क्रीडा मंडळाच्यावतीने स्पर्धेसाठी चार मैदाने तयार करण्यात आली आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शैलेश जाधव, उपाध्यक्ष प्रदीप जाधव, सचिव अभिजीत कदम, सहसचिव सत्यजित आयरे, खजिनदार अविनाश जाधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व खेळाडू मेहनत घेत आहेत.
फोटो- स्पर्धेसाठी तयार होत असलेली मैदाने.
छाया- सत्यजित आयरे.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!