रत्नागिरी : नगर परिषदेचा रखडलेला घनकचरा प्रकल्प व साळवी स्टॉप येथील धूर प्रदूष्णाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून येत्या 15 दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलन करू असा इशारा माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद किर यांनी नगर परिषद प्रशासनाला दिला आहे.
साळवीस्टॉप येथील कचरा जाळणे व त्याच्या धुरामुळे सर्व परिसरामध्ये प्रदुषण पसरणे ही बाब नित्याचीच झाली आहे. गेली अनेक वर्ष लोकांना याचा त्रास होत आहे. याबाबत उपविभागीय कार्यालय महाराष्ट्र प्रदुषण मंडळ बोर्ड रत्नागिरी यांच्याकडेदि.१६/०२/२०२१ रोजी निवेदन देऊन त्याची कॉपी नगरपरिषद रत्नागिरी, पोलीस अधिक्षक रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांना देखील १६/०२/२०२१ रोजी दिलेले आहे. त्याचप्रमाणे हायकोर्ट मुंबई यांच्याकडे १२/०४/२०२१रोजी तक्रार केली होती. त्याची हायकोर्टान देखील दखल घेऊन त्याबाबतची कारवाई करुन अर्जदाराला लवकरात लवकर कळवावे असे हायकोर्टाने सांगितले होते. मात्र हायकोर्टच्या डायरेक्शनला देखील केराची टोपली दाखवण्याचे काम आपल्या नगरपरिषदेकडून झाले आहे. नगरपरिषदेला जागा उपलब्ध होऊन, घनकचरा प्रकल्पाचा डीपीआर तयार होऊन टेंडर प्रक्रिया झाली आणि त्यानंतर रत्नागिरी अचानक टेंडर प्रक्रिया रद्द केली. त्यामुळ रत्नागिरी नगर परिषद किती लोकांच्या आरोग्याशी खेळते आहे. हे यावरुन स्पष्ट होत आहे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासक म्हणून आपली आहे. याबाबत जर पंधरा दिवसांमध्ये घनकचरा प्रकल्पाची कार्यवाही केली नाही. तर आम्ही आपल्या विरुध्द आंदोलन करूअसा इशारा मिलिंद किर यांनी दिला आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.