मेष : आर्थिक व्यवहारात सावधानी बाळगा. व्यवसायात सावध राहणे गरजेचे आहे. डोळे आणि कान जागृत ठेवा. व्यसनापासून दूर राहा.
वृषभ : अध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य लाभेल. सामाजिक विषयात सहभागी होण्यासाठी संधी मिळेल. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्याचा अभ्यास केला पाहिजे हे लक्षात ठेवले तर आपली प्रगती होणार आहे. आज काम करण्याची प्रचंड ऊर्जा तुमच्यात असणार आहे.
मिथुन : आजचा दिवस अतिशय सुंदर स्वरूपाचा असणार आहे. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. आई-वडिलांपासून कोणती गोष्ट लपवली असाल तर ती आज तुम्ही त्यांना सांगू शकता. न बोलता शांत राहणे आज तुम्हाला चिंतेचा विषय ठरू शकते.
कर्क : धार्मिक गोष्टींमध्ये आज तुम्ही आवड दाखवाल. मित्रमंडळींबरोबर पार्टीमध्ये सहभागी होऊन आनंद लुटण्यात आज तुम्हाला समाधान वाटेल. आर्थिक बाजू मजबूत राहणार आहे. नवीन योजना आपण आखू शकता जीवनसाथी कडून तुम्हाला चांगली मदत मिळणार आहे.
सिंह : आज शांत रहा. आर्थिक बाजू मजबूत राहील पण पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्यामध्ये चांगली क्षमता आहे त्याचा फायदा करून घ्या. जीवनसाथी आज तुमची प्रशंसा करणार आहे.

संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
7263096801
कन्या : आज तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे काही गोष्टी तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. तुमच्या काही गोष्टी तुमच्या जीवनसाथी व्यक्तीला आवडत नाहीत त्या बदलण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या व्यक्तींना वेळ द्या.
तुळ : व्यावसायिक क्षेत्रात आज तुमचा दिवस उत्तम असणार आहे. अध्यात्मिक विषयात आवड निर्माण करण्यासाठी उत्तम वेळ आहे. तणावापासून दूर राहण्यासाठी ध्यान योगा करणे फायद्याचे ठरेल. मनोरंजन विषयात वेळ घालवाल आणि ताजे तवाने राहाल.
वृश्चिक : आज तुम्ही आराम करू शकता. आर्थिक बाजू कशीही असली तरीही त्यामुळे तुमचे नाते क खराब होणार नाही याकडे लक्ष द्या. अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होईल की ज्यामुळे तुम्ही आनंद अनुभवू शकता. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळू शकते.
धनु : मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नका. कोणत्याही एक कारणामुळे आज तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. आज तुम्हाला वयस्कर व्यक्तीप्रमाणे कोणालातरी सल्ला द्यावा लागेल. आज तुम्हाला स्वतःचा फायदा पहायचा असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना खुश ठेवा.
मकर : आज कोणत्यातरी एका कारणामुळे तुमचा मूळ खराब होऊ शकतो. व्यर्थ विचार करणे सोडून द्या त्वचाशी संबंधित आणि पोटाशी संबंधित विकार मान वर काढतील. आज तुम्ही एकांतात राहणे जास्त पसंत कराल.
कुंभ : फार विचार करणे तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. मित्रमंडळींबरोबर वेळ घालवू शकता ज्यातून तुम्हाला आनंदच मिळेल. आज कोणत्या कारणामुळे तुम्हाला शाब्बासकी मिळू शकते. स्वतःला शांत ठेवा तुमच्या फायद्याचे आहे.
मीन : आज तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा असणार आहे. जवळच्या नातेवाईकांकडून धनलाभ होण्याची संधी चालून येईल. आज तुमच्या कामांमध्ये अडथळे येणार नाही कामे पूर्ण होतील. जीवनसाथीला आज वेळ द्या. प्रेम संबंधात आजचा उत्तम दिवस असणार आहे.
*दखल न्यूज महाराष्ट्.*