➡️ मेष : आर्थिक योजना तयार करण्यासाठी उत्तम दिवस आहे. जमीन मालमत्ते संदर्भात थांबलेले काम आज होऊ शकते. चांगल्या लोकांमध्ये राहण्यास आपणास संधी मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय सुंदर असा असणार आहे. घरातील वातावरण देखील चांगले असणार आहे खाण्याच्या पदार्थांमध्ये तेलकट तुपकट टाळा.
➡️ वृषभ : स्थलांतराचे योग दिसून येत आहेत. आपण ज्या ठिकाणी काम करत आहात त्या ठिकाणी तुमची बदली होऊ शकते. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मध्यस्तीच्या मदतीने कोणते तरी काम होऊ शकते. व्यावहारिक दृष्टिकोनातून व्यवहाराकडे पहा भावनिक होऊ नका.
➡️ मिथुन : आज तुम्ही ठरवल्याप्रमाणे आजचा दिवस नियोजित पद्धतीने जाणार आहे. कोणी व्यक्तीच्या येण्याने आज तुम्हाला फायदा होणार आहे. संपत्ती संदर्भात गोष्टींमध्ये यश मिळेल. मेहनतीचे उचित फळ मिळणार आहे.
➡️ कर्क : कोणताही निर्णय घेताना गडबड करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. मुलांकडून शुभ समय समाचार मिळेल. कसली तरी भीती तुम्हाला सतत वाटत राहील पण आजचा दिवस तुमच्यासाठी सुंदर आहे.
➡️ सिंह : राहत्या घरामध्ये बदल करण्याची योजना बनवत असाल तर त्यामध्ये यश मिळेल. अनेक दिवसापासून चालत आलेली समस्या आज मिटणार आहे. जवळच्या व्यक्तींची उत्तम साथ मिळेल. आर्थिक बाजू मजबूत असणार आहे.
➡️ कन्या : आजचा दिवस खुप दिवसानंतर तुमच्यासाठी चांगला असणार आहे. एखादी जुनी चुकीची सवय सोडण्याचा संकल्प आज तुम्ही करू शकता. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आणि आशीर्वाद अवश्य घ्या, व्यवसायामध्ये आज तुम्हाला जागृत राहण्याची आवश्यकता आहे; मात्र यश तुमचे आहे.

▶️ वेगवेगळ्या आजारांवर दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आता रत्नागिरी मध्ये उपलब्ध..
▶️ प्रगत मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी.
▪️ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️ कर्करोग शस्त्रक्रिया
▪️रोबोटिक शस्त्रक्रिया
▪️थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
▶️ आजच संपर्क करा..
▶️ डॉ. मिहीर चितळे
संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
📞 7263096801
➡️ तुळ : दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल. त्यामुळे आज तुम्ही प्रसन्न राहाल. घरातील सुख सुविधा यासाठी तुम्ही काहीतरी खरेदी कराल. स्वतःच्या वाणी वरती नियंत्रण ठेवा. कोणालाही दुखावू नका. पारिवारिक लोकांबरोबर तुम्ही बाहेर जाण्याचा नियोजन करू शकता.
▶️ वृश्चिक : ग्रहांची स्थिती आज उत्तम आहे. आजचा तुमचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. तुमची योग्यता आणि क्षमता तुम्ही इतरांना दाखवून द्याल, व्यावसायिक यश आज तुम्हाला प्राप्त होईल. नोकरी करीत असलेल्या व्यक्तीने वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवून वागा.
➡️धनु : नोकरी संदर्भात शुभ वार्ता मिळेल. नोकरीसाठी प्रवास घडेल तुम्हाला आज अनेकांकडून चांगली मदत मिळू शकते. वैवाहिक जीवन उत्तम राहील.
➡️ मकर : आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असणार आहात. पण तरीही तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. आज तुमच्या भरपूर ऊर्जा असणार आहे. आर्थिक योजना तयार करू शकता. अपरिचित लोकांशी जास्त संपर्क ठेवणे योग्य नाही. जीवनसाथीकडून आज काहीतरी गोड वार्ता मिळेल.
➡️ कुंभ : महत्वाच्या व्यक्तीशी आज भेट होईल. मानसन्मान आत्मविश्वास वाढेल, कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झाले असाल तर यश मिळेल. आज तुम्हाला तुम्ही पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ मिळणार आहे.
➡️ मीन : नवीन काम सुरू करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. सामाजिक क्षेत्रामध्ये काम कराल. विद्यार्थ्याने स्वतःला काय मिळवायचे आहे याकडे लक्ष द्या. आरोग्य संदर्भात काहीशी समस्या जाणवू शकते.
▶️ दखल न्यूज महाराष्ट्.
