रत्नागिरीः- वाहन खरेदीच्या आर्थिक व्यवहारातून एकाला जबर मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार 26 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वा. हातखंबा येथील होळी कुठाजवळ घडली आहे.
सागर कदम (रा. कदमवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात बालाजी सुभाष ठेंगिल (26, रा. झरेवाडी, रत्नागिरी) याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या दोघांमध्ये वाहन खरेदीच्या आर्थिक व्यवहारातून वादविवाद आहेत. यातूनच शनिवारी रात्री सागरने बालाजीला शिवीगाळ करत लोखंडी फाईट आणि हॉकी स्टिकने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली असे तक्रारीत म्हंटले आहे.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*