रत्नागिरी : भारत जोड़ो यात्रा अभुत पूर्व यश मिळाले. वाढती घरगुती वस्तूची महागाई, पेट्रोल डिझेल, गॅस व बेरोजगारी या विषया वरून जन जागृती करण्यात यश मिळाले सामान्य जनता लाखो च्या पटीने सदर यात्रेला मा.खा.राहुल गांधी यांच्या बरोबर जोडले गेले. त्याचबरोबर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले साहेब यांच्या सुचने नुसार देशाच्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२३ पासून ‘ हात से हात जोड़ो’ अभियान सुरू करण्याच्या सूचना प्रत्येक जिल्हास्तर वर देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावपातळीवर प्रत्येक मतदान केंद्र वर पुढील २ महिने सदर अभियान राबविण्यात येणार असून सामान्य जनते पर्यंत काँग्रेसचे विचार भारत जोडो यात्रा चे महत्व पोचविण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करणार . सदर उपक्रमचे नियोजन साठी काँग्रेस भवन कार्यालय, रत्नागिरी येथे सभेचे नियोजन करण्यात आले होते . सदर उपक्रमा साठी समन्वयक व म्हणून ॲड. प्रवीण ठाकूर व रत्नागिरी निरीक्षक ॲड गुलाबराव घोरपडे साहेब प्रदेश पातळी वरून उपस्थित होते . सदर सभे मध्ये 26 जानेवारी पासून सुरुवात होणाऱ्या हात से हात जोडो अभियान गावपातळीवर प्रत्येक मतदान केंद्र वर पूर्णपणे यशस्वी पणे राबवणार असा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी निर्धार केला . सदर नियोजन बैठक खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली व पुढील नियोजन बैठक दिनांक 23/01/2023 सोमवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता ठरविण्यात आली. सदर बैठकीला जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष अशोक जाधव, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत,सोशल मीडिया विभाग राज्य समन्वयक विनय खामकर, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा ॲड अश्विनी आगाशे,मिडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हरिष शेकासन, एन एस यू आय जिल्हाध्यक्ष अमित पवार, सेवा दल जिल्हाध्यक्ष अन्वर काद्री, अनुसूचित जाती जमाती विभाग जिल्हाध्यक्ष रघुनाथ आडविरकर,*चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, भारत खेडेकर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रफीक मोडक, रत्नागिरी महिला तालुकाध्यक्ष रिजवाना शेख, भारत खेडेकर, रवींद्र खेडेकर, चिपळूण काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, तालुका उपाध्यक्ष जनार्दन पवार, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष दीपक निवाते यांच्यासह विविध तालुक्यातील पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, प्रदेश प्रतिनिधी, विविध सेल, विभाग यांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

चालू किंवा बंद अथवा तुटलेल्या स्थितीत असलेल्या फोन ची योग्य किंमत मिळवा आणि खरेदी करा नवीन फोन➡️
सोबत EMI सुविधा उपलब्ध
नवीन मोबाईल बरोबर हमखास भेटवस्तू🎁
त्वरा करा लवकर भेट द्या आणि आपल्या जुन्या फोन ची किंमत जाणून घ्या✔️
आपलं हक्काचं दुकान😊
आमचा पत्ता✍️:
29 मोरया मोबाईल्स,शंखेश्वर आर्क्रेड, आठवडा बाजार ,रत्नागिरी
9272682666
9422392425