बातम्या

भरणे नाका येथे माशाची उलटी विक्रीसाठी आणणारे तीन जण पोलिसांच्या ताब्यात..

खेड : खेड पोलीस ठाणे हद्दीमधील भरणे नाका येथील साई रिसॉर्ट च्या जवळ काही व्यक्ति लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी अर्थात अंबरग्रीसची विक्री करिता येणार आहेत अशी गुप्त बातमी मिळाली.त्यानंतर लागलीच खेड पोलीस ठाणे येथील पो. उपनिरीक्षक श्री. सुजीत सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, वनरक्षक, खवटी, खेड श्री. रानबा परशुराम बंबर्गेकर यांचे सह, खेड पोलीस ठाणे यांचे एक पथक तयार केले व या पथकासह खेड पोलीस ठाणे हद्दीमधील भरणे नका येथील साई रिसॉर्टच्या जवळ सापळा रचला गेला. भरणे नाका येथील साई रिसॉर्ट जवळून ३ इसमांना संशयितरित्या २ दुचाकीवरून जाताना या पथकाने थांबविले व लागलीच त्यांची झडती घेता, त्यांच्या ताब्यात असलेल्या एका पिशवीत ‘लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस)’ मिळून आली.
या कारवाई मध्ये, ३ पर जिल्ह्यातील इसमांना, वन्य जीव (संरक्षण) अधिनियम प्रमाणे खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून, २ दुचाकी व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यामधील अन्य सहभागी व्यक्तींचा शोध घेण्याकरिता अधिक तपास करण्यात येत आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.          

BuyBack Offers
चालू किंवा बंद अथवा तुटलेल्या स्थितीत असलेल्या फोन ची योग्य किंमत मिळवा आणि खरेदी करा नवीन फोन➡️
सोबत EMI सुविधा उपलब्ध
नवीन मोबाईल बरोबर हमखास भेटवस्तू🎁
त्वरा करा लवकर भेट द्या आणि आपल्या जुन्या फोन ची किंमत जाणून घ्या✔️
आपलं हक्काचं दुकान😊
आमचा पत्ता✍️:
29 मोरया मोबाईल्स,शंखेश्वर आर्क्रेड, आठवडा बाजार ,रत्नागिरी
9272682666
9422392425

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!