रत्नागिरी : शहराच्या मुख्य बाजारपेठेत रामआळी भागात पीठ व मसाल्याच्या चक्कीतील पट्ट्यात पाय अडकून चक्कीमालक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. शनिवारी सायंकाळी उशिराने ही घडली. यातील जखमीला गंभीर अवस्थेत कोल्हापूरला उपचारासाठी नेण्यात आले आहे.
जखमी झालेले गृहस्थ शहरातील तेली आळी येथे राहणारे असून अनिल भार्गव पोटफोडे (५७) यांची राम आळी येथे पीठ व मसाला गिरण आहे. शनिवारी सायंकाळी गिरणीमध्ये काम सुरू असताना गिरणीच्या बेल्ट मध्ये पाय अडकून ते मशीन मध्ये खेचले गेले या त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने परिसरातील व्यावसायिकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.
