मुंबई – (प्रमोद तरळ) गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडळ मुंबई, महिला समिती,शिक्षक समिती आणि युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा “गोठणे दोनिवडे युवक चषक २०२३”, चे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे
सदर स्पर्धा रविवार दि.१६ एप्रिल २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान दादर (प) मुंबई येथे होणार आहे स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला रु २१०००/- व आकर्षक चषक, द्वितीय रु १५०००/- व आकर्षक चषक, तॄतीय रु २५००/- व आकर्षक चषक, चतुर्थ रु २५००/- व आकर्षक चषक मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनाही आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
या सामन्या ठिकाणी पंचक्रोशीतील युवकांनी उपस्थित राहून खेळाचा आनंद घ्यावा असे आवाहन युवक मंडळाचे अध्यक्ष अविनाश राघव, उपाध्यक्ष महेंद्र नाचणेकर, सरचिटणीस उमेश हातणकर, सरचिटणीस कु. अभिषेक मांडवे, खजिनदार मंगेश तरळ आणि सर्व मंडळाने केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र
