रत्नागिरी : दिनांक 16/04/2023, वार रविवार.
रोजी श्री राजेंद्र शंकर डापले, राहणार धामनसे सांबरेवाडी,ता. जि.रत्नागिरी, यांच्या राहत्या घरी पाळीव लॅब जातीच्या कुत्र्यावरती पहाटे कुत्र्यास शौचास सोडले असता, धामणसे गावात वावर करणाऱ्या वाघाने हल्ला करून ठार केले.
वनअधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा वनाधिकारी दुर्लक्ष करत आहेत, असे गावातील लोकांचे म्हणणे आहे. गावातील बऱ्याच गुरे व पाळीव कुत्र्यांवर,या वाघाने हल्ले केलेत, वनाधिकारी आता माणसांवरती वाघ हल्ले करण्याची वाट बघत आहेत का ?असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्तीत होऊन भयाचे वातावरण गावामध्ये तयार झाले आहे,
तरी वन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन, त्वरित या उपद्रव करणाऱ्या वाघास जेरबंद करून जंगलात सोडावे ही विनंती, राजेंद्र शंकर डापले व अन्य गावकरी करत आहेत, स्थळ धामनसे सांबरेवाडी येथील वाघाचा वावर थांबवा यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.
