बातम्या

नॅशनल स्काॅलर सर्च परीक्षेत ताम्हाणे नं ५ शाळेचा राज्यात झेंडा..

राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील जि.प. शाळा ताम्हाणे नं ५ या शाळेतील विद्यार्थ्यांनी नॅशनल स्काॅलर सर्च परीक्षेत (NSSE) घवघवीत यश प्राप्त केले असून सन २०२२/२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत जि प . शाळा ताम्हाणे नं .५ या शाळेतून परीक्षेला बसलेल्या ८ पैकी ८ विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान असे यश मिळविले आहे.
या स्पर्धा परिक्षेत बसलेले कु . हर्षण सहदेव सौंदळकर इयत्ता – चौथी याने २०० पैकी १९२ गुण मिळवून राज्यात चौथा तर कु . तन्मय तानाजी वाफेलकर इयत्ता- तिसरी याने २०० पैकी १८२ गुण मिळवून राज्यात १० वा येण्याचा मान पटकावला आहे . सर्व विद्यार्थ्याना केंद्रप्रमुख श्री विनायकजी खानविलकर यांची प्रेरणा, सौ प्रिया प्रविण किंजळस्कर व दिपिका अनंत तारळेकर यांचे मार्गदर्शन लाभले . विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल ताम्हाणे पंचक्रोशीतून सर्व विद्यार्थ्याचे कौतुक होत आहे .ताम्हाणे गावातील समाजिक कार्यकर्ते श्री प्रदिप हरी कडू व आदर्श नवजीवन संस्था ताम्हाणे कडूवाडी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!