➡️ मेष
आजच्या दिवसाची सुरवात चांगली असणार आहे. कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मेहनतीचे फळ प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात उत्तम दिवस.
➡️ वृषभ
व्यापार- व्यवसायात उत्तम यश मिळेल असा आजचा दिवस. सगळी महत्वाची कामे आज तुम्ही दिवसाच्या पूर्वार्धात करा.
आर्थिक लाभ घेण्यासाठी उत्तम आजचा दिवस आहे. व्यावसायिक प्रति स्पर्धकांना कमजोर कराल.
मिथुन
बौद्धिक कामे व चर्चा करून निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवस आहे. तब्येत तुमची आज थोडी नरमच राहील कामे मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागतील त्यामुळे आनंदी आनंद होईल. आजार अंगावर काढू नका.

➡️ कर्क
शारीरिक मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासाचा त्रास होईल. कार्यक्षेत्रातील तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दुपार नंतर उत्तम साथ मिळेल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न मित्राच्या मदतीने सहजच सोडवाल. शांत राहण्याचा प्रयत्न करा..
➡️ सिंह
आजचा दिवस प्रवासासाठी उत्तम आहे. नातेवाईक यांच्याकडून चांगली बातमी कळेल. व्यापार उद्योगास चांगली गती येईल. कोणत्याही कारणाने आजचा मुड खराब होईल. शांत राहून विचार करणे गरजेचे आहे.
➡️ कन्या
नवीन काम सुरू करणे आज टाळा. आपली मनस्थिती आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात. अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. घराबाहेर वावरताना रागावर लगाम ठेवा.
➡️ तूळ
आज मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा. अनावश्यक खर्च टाळा. एखादा मोठा खर्च संभावू शकतो. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
➡️ वृश्चिक
कोणत्याही गोष्टी संताप करू नका. शांत राहणे योग्य राहील संयमीपणा दाखवा. स्वतःला शांत ठेवण्यासाठी योगाभ्यास मेडिटेशन करा. आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे ते नक्की करा.
➡️ धनु
आर्थिक दृष्ट्या उत्तम लाभाचा दिवस आहे उद्योग व्यवसायात यश प्राप्त होईल. आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रकृतीकडे लक्ष द्या मानसिक त्रास कमी करण्यासाठी विचार कमी करा.
➡️ मकर
नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या मार्गातील अडथळे आता दूर होतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत रहा. आजचा दिवस समिश्र स्वरूपाचा असणार आहे.
➡️ कुंभ
नवीन काम सुरू करण्यास आजचा दिवस चांगला आहे. आई वडिलांकडून काहीतरी मिळेल. दुपार नंतर उत्तम दिवस असणार आहे.
मीन
कार्यक्षेत्रात डोक्यात ताप देणाऱ्या काही घटना घडणार आहेत नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच सांगा फार खोलात शिरून तुमच्याच अडचणी वाढतील. आपल्याला कार्यरत राहायचं आहे डोकं शांत ठेवावे लागेल.. भविष्यात लाभाची संधी मिळणार आहे.
