राजकीय

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त डोर्ले दाभिळ आंबरे गावात छत्री वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

प्रतिनिधि : प्रथमेश बोडेकर

प्रतिनिधी : रत्नागिरी तालुक्यातील शिवसेनेच्या 55 वर्धापन दिनानिमित्त डोर्ले, दाभिळ आंबरे गावातील खोतमळी,मधली वाडी ,गुरव वाडी ब्राह्मण वाडी, भंडार वाडी ,कुड वाडी ,गणेशमळी, व कुवार वाडी या ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना पावसाळ्यातील गरज ओळखून वाटप करण्यात आले.
शिवसेनेचा वर्धापन दिन आज राज्यभरात साजरा करण्यात येत आहे त्यातच शिवसेना (शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांकडून ग्रामीण भागात लोकांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे
त्यातच डोर्ले, दाभिळ आंबरे गावात मंत्री उदय सामंत यांचे खंदे समर्थक म्हणून अजय तेंडुलकर (शिवसेना विभाग संघटक पावस) यांना ओळखले जाते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली छत्री वाटप कार्यक्रम करण्यात आला . तेंडुलकर हे समाज सेवेचे काम अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात गोरगरीब जनतेसाठी करत आहे त्यामुळे पक्षाला त्याचा फायदा होत असतो असे बोलले जात आहे
या कार्यक्रमप्रसंगी महेश साखळकर (शाखाप्रमुख), नंदकुमार लिंगायत (उपशाखाप्रमुख) ,अक्षय दैत ,सुधाकर दैत ,आशिष पोकडे, समीर तेंडुलकर, सचिन रांबाडे, चंद्रकांत घवाळी, राजेश पाटकर , आशिष पाटकर भुपेश कुवार (शाखा प्रमुख दाभिळ आंबरे)संजय कुवार सुनील कुवार आदी पदाधिकारीसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!