राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील माध्यमिक विद्यालय गोठणे,दोनिवडे शाळेतून (एस,एस,सी) माध्यमिक शालांत परीक्षेत कु. दिक्षिता प्रकाश नाचणेकर हिने ८३.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कु. दिक्षिता हिची घरची परिस्थिती बेताची असून सुध्दा प्रमाणिकपणे अभ्यास करण्याची चिकाटी, जिद्द या गुणांच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. दिक्षिताची आई शेतीची कामे करते व तिचे वडील प्रकाश नाचणेकर हे मुंबईत खाजगी कंपनीत नोकरी करतात
दिक्षिताने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे दि. १६ जून २०२३ रोजी पंचायत समिती राजापूर शिक्षण विभागातर्फे प्रमाणपत्र आणि शिवसेना युवा सेना लांजा राजापूर साखरपा यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व आईला शेतीकामात मदत करतानाच तिने मिळवलेल्या यशाने तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे शाळेतून प्रथम आल्याबद्दल नाचणेकर वाडी विकास मंडळ मुंबई. वाडीतील गावकर मंडळी, ग्रामस्थ तसेच राजापूर तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र
