प्रतिनिधी : चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द गावातील अतिरिक्त पदभार तलाठी अश्विन नंदगवळी वय वर्ष 33 याला 45000 रु लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे लाचेचे कारण – आरोपी लोकसेवक यांनी दि. 01/06/2023 रोजी यातील तक्रारदार वय वर्ष 37 व त्यांचे सहहिस्सेदार यांच्या नावे असलेल्या बिनशेती जमिनीचे दोन समान हिस्से करून उप विभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण यांच्याकडून बिनशेती जमिन विभाजनाचे आदेश प्राप्त करून घेण्याकरिता उप विभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण येथील कर्मचारी यांच्यासाठी रु. 40,000/- व वेगळा सातबारा देण्याकरिता मंडळ अधिकारी यांच्यासाठी रु. 5,000/- असे एकूण रु. 45,000/- लाच रक्कमेची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले. त्याअनुषंगाने, आज दि. 22/06/2023 रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांना रु. 45,000/- लाच रक्कम स्वीकारल्यानंतर तलाठी कार्यालय, पिंपळी खुर्द येथे पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.
चिपळूण तहसीलदार कार्यालयात एकच गोंधळ उडाला आहे .जिल्ह्यातील ही पाहिच घटना नाही वारंवार महसूल विभागात लाचखोरी समोर येत असली तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ,रत्नागिरी कारवाई करण्यात अव्वल आहे.
▶️ ला.प्र.वि., रत्नागिरी सापळा पथक –
1. PI प्रविण ताटे
2. HC संतोष कोळेकर
3. PC हेमंत पवार
4. PC राजेश गावकर
5. PC प्रशांत कांबळे ( चालक )
➡️ पर्यवेक्षक अधिकारी –
मा. सुशांत चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक, ला.प्र.वि., रत्नागिरी
▶️ मार्गदर्शक अधिकारी –
1. मा. सुनिल लोखंडे सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे
2. मा. अनिल घेरडीकर सो, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे
▶️ आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी – मा. उप विभागीय अधिकारी, चिपळून
▶️ रत्नागिरी जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील नमुद क्रमांकावर संपर्क साधावा.
▶️ संपर्क –
1. ला.प्र.वि., रत्नागिरी कार्यालय दूरध्वनी क्र. – (02352-222893)
2. मा. सुशांत चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक, ला.प्र.वि., रत्नागिरी दूरध्वनी क्र. – (9823233044)
3. प्रविण ताटे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., रत्नागिरी दूरध्वनी क्र. – (8055034343) & (7470040707)
4. अनंत कांबळे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., रत्नागिरी दूरध्वनी क्र. – (7507417072)
5. टोल फ्री दूरध्वनी क्र. – 1064
▶️ चला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करू…
दखल न्यूज महाराष्ट्र
