अलिबाग : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैयांविरुद्ध कोर्लई ग्रामपंचायती समोर व अलिबागमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध आंदोलन दि.१८ जुलै रोजी करण्यात आले. शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर १९ बंगल्या प्रकरणाचे खोटे आरोप करणाऱ्याच्या तोंडात शेण भरवण्यात आले असे आंदोलांकडून सांगण्यात आले. त्यांचा पुतळा देखिल जाळण्यात आला. लोकांवर ईडी लावण्याऱ्याची अश्लील सीडी बाहेर आल्याचे देखील कोर्लई महिला आक्रमक होवून बोलत होत्या. एकंदरितच तीव्र निषेध दर्शविला होता.
प्रतिनिधी अलिबाग मिथुन वैद्य
दखल न्यूज महाराष्ट्र.
