बातम्याराजकीय

रत्नागिरी शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर भाजप आक्रमक.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने रत्नागिरी नगरपरिषद येथे करण्यात आली आरती..

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते, महिला मोर्चा, युवा मोर्चा तर्फे रत्नागिरी नगरपालिकेत एकत्र येत शहरातील समस्यांचा पाढा वाचण्यात आला. गणेश उत्सव पूर्वी पावसाळी डांबर वापरून खड्डे भरणे, उनाड गुरे, स्ट्रीट लाईट दुरुस्त करणे, मच्छर प्रतिबंधक फवारणी करणे इतर शहरातील विविध प्रश्नांवर टाळ मोर्चा काढण्यात आला त्यावेळी नगरपरिषद मध्ये टाळ वाजवत आरती म्हणून निषेध करण्यात आला.
            त्यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री बाबर साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यावेळी त्यांनी गणपतीच्या आधी शहरातील सर्व खड्डे भरणे, स्ट्रीट लाईट दुरुस्त करू असे सांगितले.

मुख्याधिकारी यांना निवेदन देताना भाजप कार्यकर्ते.


           तसेच जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी सोमेश्वर मधील काही ग्रामस्थांनी संपर्क करून आम्ही शहरातील उनाड गुरांचे पालन करू त्यासाठी गुरे आमच्या इथे आणून द्यावी असे त्यांनी सांगितले होते त्या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली त्यावर बाबर साहेब यांनी गुरे तिथे पोच करू व त्यांना लागणारा चारा पाणी खर्चाची थोडीफार तरतूद करू असे सांगितले. तसेच चंपक मैदान येथे उनाड गुरांसाठी सोय करण्यात येणार असल्याचेही सांगितले. तसेच ज्या भागात मच्छर फवारणी झाली असेल त्या दिवशी प्रेस नोट काढा, रत्नागिरी शहर परिसरामध्ये साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे स्वच्छता आणि फवारणी महत्त्वाची बाबआहे याकडे विशेष लक्ष द्या असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. तसेच ज्या ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असतिल त्यांनी नगरपालिकेशि संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!