कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजाच्या राजापूर शाखेच्या शुभारंभ प्रसंगी ॲड. जमीर खलिफे यांनी मार्गदर्शन करतांना, पतसंस्थेला आपले सर्वेतोपरी सहकार्य असल्याचे तसेच विधान परिषदेच्या माजी आमदार श्रीम. हुस्नबानू खलिफे यांनी फोन करून, कुणबी विकास सहकारी पतसंस्थेच्या, पाठीशी खंबीरपणे उभे राहू ,असे प्रतिपादन केले. शनिवार दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी, कुणबी विकास सहकारी पतसंस्थेच्या पाचव्या शाखेचे राजापूर येथे उदघाटन झाले. त्या उद्घघाटन सोहळ्यासाठी उद्घघाटक म्हणून ॲड. जमीर खलिफे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निबंधक मा. श्री. अविनाश इंगळे, राजापूर अर्बनचे संचालक मा. श्री. प्रकाश कातकर, राजापूर अर्बनचे मुख्यं कार्यकारी अधिकारी मा. श्री. शेखरकुमार अहिरे, राजापूर कुणबीचे अध्यक्ष मा.श्री. प्रकाश मांडवकर, राजापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. संदिप मालपेकर आणि राजापूर कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष मा. श्री. दिपक बेंद्रे,मा.श्री.गणेश जोशी (संचालक, कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या. लांजा),मा.डाॅ.प्रतिक झिमण(रत्नागिरी),मा.ॲड.महेंद्र मांडवकर (सल्लागार, कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या. लांजा), तसेच श्री.अशोक मांडवकर उपस्थित होते.
श्री. शेखरकुमार अहिरे यांनी आपल्या मनोगतामध्ये तरुण मंडळींनी, पतसंस्थेचे सभासद होणे आवश्यक असल्याचे सांगतांना सर्व व्यवहार ऑनलाईन मोबाईलद्वारे करणे, कसे आणि किती आवश्यक आहे, त्याचे महत्व विशद केले. संगणकीय बदल व नेट बँकिंगमध्ये संस्थेने सेवा देणे, म्हणजेच सर्व ग्राहकांना आपलेसे करण्यासारखे असल्याचे अहिरे यांनी सांगितले.

राजापूर कुणबीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मांडवकर यांनी सांगितले की, ही संस्थाही आपली आहे. ती मोठी करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे जे काही सहकार्य लागेल, ते आम्ही बिनशर्त करू.
अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना, श्री. चंद्रकांत परवडी म्हणाले की, सहकार क्षेत्रातील अडचणींवर मात करून, कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजाची पाचवी शाखा सुरु करीत आहोत. हे करतांना आपले मुख्यं ग्राहक हा तरुण वर्गच आहे व त्याला व्यवसायामध्येच गुंतवायचे आमचे उद्दिष्ट आहे. व्यावसायिकतेशिवाय आपला आर्थिक विकास अशक्य आहे. त्यामुळे तरुणांनी नवीन नवीन प्रोजेक्ट करावेत.व कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा, या संस्थेकडे संपर्क साधावा. असे आवाहन परवडी यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना उपाध्यक्ष श्री. विलास दरडे यांनी केली.व सूत्रसंचलन श्री. प्रभाकर सनगरे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सर्वश्री श्री. राजू कार्शिंकर, श्री. मोहन पाडावे, श्री. प्रकाश कातकर, श्री. दशरथ लिगम, श्री. रमेश पाजवे आणि संस्थेचे सर्व संचालक मंडळ, राजापूर शाखेचे प्रभारी शाखाधिकारी श्री. महेश बर्वे व सर्व शाखांचे शाखाधिकारी तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न केले. आभार संस्थेचे मुख्यं कार्यकारी अधिकारी श्री. संदिप डाफळे यांनी मांडले. दखल न्यूज महाराष्ट्र.
