कामाचा जोरदार धडाका सुरू!
गव्हाणे : योगेश कांबळे हे एका सामान्य घरातून येतात व सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी गव्हाणे जिल्हा परिषद गटात आज आपले एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. गोरगरीब जनतेची रोजच्या आयुष्याशी निगडित कामे, सरकार दरबारी असणारी कामे, लोकांच्या अडी-अडचणींना धावून जाणे, यामुळे आज दशक्रोशी मधील सामाजिक-राजकीय विश्वात त्यांची चर्चा असते. प्रत्येक राजकीय पक्ष, संघटना त्यांना आपल्याकडे ओढण्याचे अपार प्रयत्न करत असतात. सरकारी योजना, त्यातील खाचा-खुचा, नियम, कायदे, इत्यादी यांची उत्कृष्ट समज व अभ्यास त्यांचा असल्याने अन्याय होईल तेथे योगेश कांबळे हजर असतात.
योगेश कांबळे हे आगवे ग्रामपंचायतीचे सदस्य असून शिवसेनेचे उप-विभाग प्रमुख देखील आहेत. पक्षाच्या पदाचे काम हे शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब व वंचित जनतेच्या भल्यासाठी वापरायचे या तत्त्वावर ते वाटचाल करीत असतात. काही दिवसांपूर्वी ग्रामीण भाग अनेक दिवस विजेपासून वंचित असताना त्यांनी सदर प्रश्न महावितरण कडे योग्य तो पाठपुरावा करत मार्गी लावला. गव्हाणे गटातील युवक-युवती, विद्यार्थी यांना शिक्षणासाठी मदत, आरोग्य सुविधा मजबूत व्हावी यासाठीची धडपड तसेच लोकांच्या कामांसाठीची त्यांची सततची तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच लांजा व रत्नागिरी या जिल्हा ठिकाणच्या सरकारी कार्यालयांमधील त्यांच्या फेऱ्या व धडपड, यातून त्यांची जनते प्रतीची बांधिलकी दिसून येते.
दखल न्युज महाराष्ट्र.
जाहिरात..