बातम्या

लांजा साटवली येथील तलाठी आणि खानवली येथील प्रभारी तलाठी जिज्ञा वागळे यांची  एमपीएससी मधून  सहायक कक्ष अधिकारी (ASO )पदी निवड!

लांजा -राजापुर तालुक्यातून जिज्ञा यांचे सर्वत्र होत आहे कौतुक.

लांजा (प्रतिनिधी): लांजा साटवली येथील आणि खानवली येथील प्रभारी तलाठी श्रीमती जिज्ञा विजयकुमार वागळे यांची एमपीएससी मार्फत घेतलेल्या 2023 च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहायक कक्ष अधिकारी,(ASO) पदी म्हणून निवड झाली आहे . जीज्ञा वागळे हीच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे जिज्ञा वागळे ही विद्यार्थीदशे पासूनच अत्यंत हुशार आणि मेहनती मुलगी चौथी सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिटमध्ये यश मिळवले होते दहावी मध्ये शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत जिज्ञा चमकली होती जिज्ञाची यशाची कमान बहरत होती पुणे येथे इंजीनियरिंग उच्च शिक्षण घेऊन ती स्पर्धा परीक्षा याची तयारी करत होती. स्पर्धा परीक्षा करता करता महसूल विभागातील तलाठी या पदासाठी तिने परीक्षा देऊन विशेष प्राविण्य मिळवून ती तलाठी या पदावर नोकरी पत्करली नोकरी करून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा तयारी करून तिने अखेर महाराष्ट्र मंत्रालय कक्ष अधिकारी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे ती सध्यालांजा तालुक्यातील साटवली सजा येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे नुकताच तिचा विवाह कोकण रेल्वेतील इंजिनिअर असलेल्या पाटील यांच्याशी झाला. अतिशय प्रामाणिक आणि नियमावरती बोट ठेवून काम करणाऱ्या तलाठी म्हणून त्यांना ओळखले जाते.सरकारी कामामध्ये कोणतीही तडजोड न करता कायद्याच्या चौकटीत राहून आपले काम करण्यात त्यांचा हातखंडा असे. अतिशय शांत,संयमी कर्मचारी म्हणून जिज्ञा यांना ओळखले जाते
नोकरी करूनही स्पर्धा परीक्षा देऊन उज्वल यश संपादन करता येते आणि अधिकारी होऊ शकतो हे जिज्ञा हीने दाखवून दिले आहे जिज्ञाची जिद्द मेहनत चिकाटी महत्त्वाचे आहे जिज्ञाचे वडील लांजातील प्रसिद्ध आर्किटेक्चर आणि बांधकाम व्यावसायिक विजयकुमार वागळे यांची मुलगी आहे जिज्ञाचा भाऊ निमेश हा गुजरात येथील इंडियन ऑइल कंपनीमध्ये प्रोडक्शन इंजिनियर म्हणून नोकरीला आहे

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!