रत्नागिरी : संगीत सह्याद्री निर्मित ऑर्केस्ट्रा स्वरगंध सोबत संस्थापक यासिन नेवरेकर आणि राकेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना नाट्य विभाग अध्यक्षा आणि ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री पूजा ताई सावंत आणि ज्येष्ठ रंगकर्मी नरेश पांचाळ यांनी माझ्यावर विश्वास दाखवत साई बाबा ही भूमिका साकारण्याची संधी दिली , ही निवड माझ्यासाठी भाग्याची होती आणि या भूमिकेला मी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे .जेव्हा जेव्हा ऑर्केस्ट्रा स्वरगंधचे शो असतात त्यावेळी लोकांच्या खूप छान प्रतिक्रियाही येत असतात . नरेश दादा , अभिनेत्री पूजा ताई यांच्या बरोबर काम करत असताना अभिनयाची एक वेगळी ऊर्जा मिळत असते .स्वरगंधच्या माध्यमातून राकेश मोरे , यासिन नेवरेकर , स्नेहा ताई शिवलकर , सर्वता चव्हाण यांनी अनेक नवोदित गायकांना रंगमंच उपलब्ध करून देत पुढे आणलं आहे …..
माझी सुरुवात स्वराज्य प्रतिष्ठान लांजा या सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्रातील तरुणांचे प्रेरणास्थान ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय श्री ऋषिनाथ दादा पत्याणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली .कला , क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये काम करत असताना अनेक क्षेत्रांशी माझे संबंध येत गेले . त्यातूनच संगीत सह्याद्री निर्मित ऑर्केस्ट्रा स्वरगंध या कुटुंबाशी मी जोडला गेलो आणि या कुटुंबातील या दिग्गज मंडळींमुळे साई बाबा आणि इतर अनेक भूमिका साकारण्याची संधी मिळाली . अभिनेत्री पूजा ताई सावंत , नरेश पांचाळ यांच्या सोबत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणं मी माज भाग्य समजतो . स्वरगंधच्या माध्यमातून या संगीत क्षेत्रामध्ये अनेक कलाकार जोडले गेले आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद अधिकारी विजय पोकळे सर , स्नेहा ताई शिवलकर , AD. निकिता शिवलकर , ज्येष्ठ गायक सागर निंबाळकर , विनय नागवेकर, प्रवीण घोसाळकर , शकुंतला राजहंस , उर्मिला कानगुटकर , सुनील गोसावी , सौदी येथील ज्येष्ठ गायक गनी दादा बलबले , प्रिया सुरेश , ad. सावंत मॅडम अशा अनेक कलाकारांच मोलाचं मार्गदर्शन होत असतं .