चिपळूण : (ओंकार रेळेकर ) कार्यकर्ते इम्रान कोंडकरी यांनी नुकतेच सुरु केलेल्या सेस फाउंडेशनने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे.कोरोना संकटकाळ ,
महापूर संकट ,नेसर्गिक आपत्ती यावेळी लोकांच्या मदतीला सेस फाउंडेशन नेहमी पुढे असते,इम्रान कोंडाकरी यांच्या सेस फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे .अशी प्रतिक्रिया आखाती देश दुबई येथील उद्योजक बशीरभाई हजवांनी यांनी सोमवारी येथे बोलताना व्यक्त केली.
दुबई येथिल जे.एम.बी.आर फाउंडेशनचे प्रमुख उद्योजक बशीरभाई हजवांनी काल आपल्या नियोजित दौऱ्यानिमित्त चिपळूण येथे आले असता इम्रान कोंडकरी मित्रमंडळ आणि सेस फाउंडेशन यांच्या वतीने बहादूरशेखनाका येथील हॉटेल इलेव्हन् येथे बशीरभाई हजवांनी यांच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेल इलेव्हनचे संचालक पंचायत समिती सदस्य आबू ठसाळे यांनी आपल्या नव्या हॉटेलमध्ये प्रथमच आलेले हजवांनी यांचे स्वागत केले.कोरोना संक्रमण काळ,महापूर संकट ,नेसर्गिक आपत्ती,अतिरुष्टी, अपघात या वेळी सेस फाउंडेशन नेहमी मदत कार्यात देवदूताची भूमिका बजावत असते.
शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातही इम्रान कोंडकरी यांचे मौलाचे कार्य असते या कार्याची विशेष दखल बशीरभाई हजवांनी यांनी घेऊन कार्याचे कौतुक केले आहे.सेस फाउंडेशन आणि इम्रान कोंडकरी यांना
भविष्यात आपले सर्वोत्परी सहकार्य राहील असे आश्वासन या वेळी बोलताना बशीरभाई हजवांनी यांनी दिले.कोंडकरी मित्रमंडळ यांच्या वतीने खास आकर्षण ठरलेल्या पुष्पहार घालून हजावांनी यांचा भव्य सत्कार करण्यात आला.सत्कार कार्यक्रम पाहून हजवांनी आणि सोबत आलेली सर्व मंडळी भारावून गेली होती.मर्चंड नेव्ही अधिकारी, सेस फाउंडेशनचे अध्यक्ष इम्रान कोंडकरी, आबू ठसाळे,
जलाल कादिरी, आरीफ मुल्लाजी, रऊफ खतीब सर,श्रीराज पटेल,मुनाफ दादम, खालिद चोगले, अस्लम हजवांनी,शिराज हजवांनी,बिलाल ममतुले, कबरुद्दीन हजवांनी,अब्ब्रार खान,इब्राहिम हजवांनी,हिदायत जमादार, एकबर ताज,जमाल नदाफ, अरबाज नांदगावकर,सेस फाऊंडेशनचे संचालक इम्रान खतीब,अस्लम हजवानी,श्रीराज हजवानी, खालिद खडस, शब्बीर राजीवटे, जफर कटमाले वहाब बेबल, अनिस बेबल, उदय ओतारी, हनीफ दळवी, कादीर परकार, अबू चौगुले, खालिद चोगले, इम्रान सय्यद, जाकीर बगदादी, सिद्दिक बेबल, तन्वीर खेरटकर,
अब्बास सय्यद, अरफत चौगुले यावेळी उपस्थित होते.
फोटो : आखाती देश दुबई येथिल उद्योजक कोकण भूषण ,कोकणचे सुपुत्र बशीरभाई हजवानी यांचे चिपळूण मध्ये स्वागत करताना मर्चंड नेव्ही अधिकारी, सेस फाउंडेशनचे अध्यक्ष इम्रान कोंडकरी, आबू ठसाळे,फाऊंडेशनचे संचालक इम्रान खतीब,अस्लम हजवानी,श्रीराज हजवानी, खालिद खडस, शब्बीर राजीवटे, जफर कटमाले वहाब बेबल, अनिस बेबल, उदय ओतारी, हनीफ दळवी, कादीर परकार, अबू चौगुले, खालिद चोगले, इम्रान सय्यद, जाकीर बगदादी, सिद्दिक बेबल, तन्वीर खेरटकर,अब्बास सय्यद, अरफत चौगुले, छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)