मुंबई : आजपासून नवीन वर्ष 2023 सुरू झाले असून पहिल्याच दिवसापासून सर्वसामान्यांशी संबंधित अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. असे अनेक बदल आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक आरोग्यावर होईल. बँकिंगशी संबंधित नियमांपासून ते एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या आजपासून कोणते मोठे बदल होत आहेत.
गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती बदलतात. अशात नवीन वर्षाच्या सुरुवातीला किंवा 1 जानेवारी 2023 ला एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. १ जानेवारी २०२३ पासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीही कायम आहेत. आता व्यावसायिक सिलिंडरसाठी २५ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. म्हणजेच राजधानी दिल्लीत आता व्यावसायिक सिलिंडर १७२१ रुपयांना मिळणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 1 जानेवारी 2023 पासून, बँक लॉकरशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर बँकांवर नियंत्रण राहणार असून त्यांना बँक लॉकरबाबत ग्राहकांशी मनमानी करता येणार नाही. यानंतर बँकांची जबाबदारी आणखी वाढणार आहे. कारण लॉकरमध्ये ठेवलेल्या ग्राहकाच्या वस्तूंचे कोणत्याही कारणाने नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी बँकेची असेल. ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत बँकेसोबत करारावर स्वाक्षरी करावी लागेल, ज्याद्वारे ग्राहकांना लॉकरच्या नियमांमधील बदलाबाबत एसएमएस आणि इतर माध्यमातून माहिती दिली जाईल.
कार खरेदीसाठी अधिक खर्च करावा लागेल. तुम्ही नवीन वर्षात स्वतःसाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अधिक खर्च करावा लागेल. वास्तविक, २०२३ च्या सुरुवातीपासून मारुती सुझुकी, एमजी मोटर्स, ह्युंदाई, रेनो ते ऑडी आणि मर्सिडीज सारख्या कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार आहेत. टाटाने 2 जानेवारी 2023 पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणाही केली आहे.

चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.