बातम्या

राजापूरातील पडीक कातळ सडयावर चित्रपट सॄष्टी (फिल्म सिटी) निर्माण करा – प्रदीप कोळेकर

राजापूर – (प्रमोद तरळ) निसर्ग संपन्न कोकणात, खास करून राजापूर तालुक्यात शेकडो एकर पडीक कातळ जमिनी आहेत अशा कातळ सड्यावर कर्जत (रायगड ) सारखी नितीन देसाई यांनी उभारलेल्या चित्रपट सृष्टीसारखी (Film City) निर्माण केल्यास कोकणातील कलाकार, तंत्रज्ञ , मजूर अशा शेकडो कुशल, अकुशल बेरोजगारांना रोजगार मिळेल असे मत राजापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कोळेकर यांनी मांडले आहे
हैदराबाद (तेलंगणा) येथे रामोजी Film City‌ सारख्या ६०० एकर जागेवर वसलेल्या Amusment park , water park या धर्तीवर प्रकल्प उभारल्यास हजारो लोकांना रोजगार मिळेल, देश/विदेशी पर्यटन वाढेल कोकणचे निसर्गसौंदर्यही अबाधित राहील
‌. एक मात्र नक्की की आपण‌‌ एखाद्या प्रकल्प आम्हाला नको असे ज्या एकजुटीने म्हणतो ज्या साठी आपण By hook or by crook पध्दतीचा अवलंब करतो तसाच एखादा पर्यावरण पूरक प्रकल्प आम्हाला हवा‌ म्हणून जोरकसपणे , आवेशाने ,करो वा मरो या ‌बाण्याने रस्त्यावर उतरायला हवे हे मात्र निश्चित Action is important than words असे प्रदिप कोळेकर यांनी म्हटले‌आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!