मुंबई – (प्रमोद तरळ) नवसाहित्यिक प्रोत्साहन आणि कोकणच्या घडामोडींचे गेली २१ वर्षे वार्तांकन करणाऱ्या मासिक कोकण दीप वॄत्तपत्राच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवार दि २५ जून २०२३ रोजी सायं ४.४५ वा. प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय इमारत, शारदा सिनेमाजवळ दादर पू येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
सदर सोहळ्याचे समारंभाध्यक्ष पद शिवसेना संपर्कप्रमुख दापोली विधानसभा मा. सुधीरभाऊ कदम भुषविणार असून ॲड प्रकाश सालसिंगिकर (विशेष सरकारी वकील, मुंबई हायकोर्ट), डॉ सुकृत खांडेकर (संपादक दै. प्रहार), मा. अमन भाटिया (उद्योगपती), मा. एस.एम.कदम (अध्यक्ष – एस.एम सहकारी पतपेढी), श्रीमती प्राजक्ता अविनाश वाडये (अभिनेत्री रात्रीस खेळ चाले), सौ. सिध्दी विनायक कामथ (अभिनेत्री बाळू मामाच्या नावानं चांगभलं), मा. प्रविण घाग (गिरणी कामगार सेना), मा. दत्ताराम शेडगे (मा. सभापती पंचायत समिती, दापोली), मा. एकनाथ बिरवटकर (अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ),मा. प्रकाश पाटणे, मा. राजेश सावंत, मा रणजित जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदर वर्धापनदिन व पुरस्कार वितरण कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संपादक दिलीप शेडगे, कार्यकारी संपादक पांडूरंग जाधव, व्यवस्थापक कु. निशांत शेडगे यांनी केले आहे दखल न्यूज महाराष्ट्र
