बातम्या

जनजाती सुरक्षा मंच विदर्भ आयोजित गर्जना डी-लिस्टिंग महारॅली व महामेळाव्याला गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांची उपस्थिती..

विजय शेडमाके
दि.२१ नोव्हेंबर २०२३
नागपूर:- जनजाती सुरक्षा मंच विदर्भ च्या वतीने डी-लिस्टिंग या कार्यक्रमाचे आयोजन नागपुर येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मोठया संख्येनी विदर्भातील आदिवासीय जनजातीय बांधव लाखोंच्या संख्येनी आपली संस्कृती जपत वाजत गाजत रॅलीमध्ये सहभागी होऊन मेळाव्याला सुद्धा उपस्थित होते.ही रॅली रेशीमबाग वरून ईश्वर देशमुख महाविद्यालय क्रीडा चौक पर्यत आयोजित केली होती.

या विशाल रॅलीमध्ये व मेळाव्यात खासदार अशोकजी नेते यांनी सहभाग दर्शविल्याने आदिवासी बांधवानी जंगी स्वागत केले.

धर्मांतर बंद करो, धर्म संस्कृती की रक्षा करो! देश धर्म कि रक्षा करो, दायित्व निभाओ ! भगवान बिरसा मुंडा व माता राणी कि जय!! जय सेवा… सेवा सेवा अशा नारेबाजी च्या आवाजाने मंच हादरला.

या मेळाव्याला अनेक मान्यवरांनी
आपल्या भावना भाषनाव्दारे व्यक्त करतांना आदिवासी समाजाला त्यांचे हक्क व हक्क मिळवून देण्यासाठी आदिवासी सुरक्षा मंचने कलम ३४२ मध्ये सुधारणा करून धर्मांतरित आदिवासी व्यक्तींना अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळून अनुसूचित जमातीचे आरक्षण संपुष्टात आणले. आणि संयुक्त संसदीय समितीच्या अहवालाची अंमलबजावणी १० जुलै १९६७. करण्याची मागणी केली आहे. डी-लिस्टिंग म्हणजेच आदिवासी समाजातील असे लोक ज्यांनी धर्मांतर केले (धर्म बदलला). ते आदिवासी जमातीच्या यादीतून वगळण्यात यावे आणि त्यांना अनुसूचित जमातीच्या नावाने मिळत असलेल्या आरक्षणाचा लाभ रद्द करण्यात यावा.या विषयावर देशभरात जनजागृती करण्यासाठी आदिवासी सुरक्षा मंच प्रत्येक जिल्ह्यात, जिल्हा परिषदा व इतर समितीच्या माध्यमातून जागृती केली जाणार.

डी-लिस्टिंग महारॅलीमध्ये आदिवासी समाजातील हजारों नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा आणि पारंपरिक हत्यारांसह रॅलीत सहभागी होऊन एकजुटीचे दर्शन घडवले. यावेळी मोठ्या संख्येने विदर्भातुन आलेले आदिवासीय नेते मंडळी व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.तसेच विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी समाज बांधव भगींनी लाखोंच्या संख्येनी उपस्थित होते.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!