महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.
दिनांक :- 11 डिसेंबर 2023
रत्नागिरी :- झारखंडचे काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या दहा ठिकाणावर आयकर विभागांनी छापा टाकला. या छापांमध्ये शाहू यांच्याकडून 354 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने महिला व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ’70 वर्ष देश लुटला, काँग्रेसने फक्त पैसा खाल्ला’, ‘मोहब्बत की दुकानं चोरी का सामान’, काँग्रेसचा हात भ्रष्टाचाराला साथ.. अशा आशयाच्या घोषणा यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या.
यावेळी भाजपा रत्नागिरी विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब माने, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजाता ताई साळवी, प्रदेश सदस्या सौ अंजलीताई साळवी, वर्षा ढेकणे, पल्लवी पाटील, जोशी, शहराध्यक्ष राजन फाळके, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस विक्रम जैन, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, दादा ढेकणे, संदीप सुर्वे, योगेश हळदवणेकर, श्री संतोष बोरकर, सुप्रिया रसाळ, शिवानी सावंत, आदी महिला मोर्चा, युवा मोर्चा, शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.