महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता ताई हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.
विजय शेडमाके.
दिनांक :- 11 डिसेंबर 2023
गडचिरोली :- झारखंडचे काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या दहा ठिकाणावर आयकर विभागांनी छापा टाकला. या छापांमध्ये शाहू यांच्याकडून 354 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने महिला व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ’70 वर्ष देश लुटला, काँग्रेसने फक्त पैसा खाल्ला’, ‘मोहब्बत की दुकानं चोरी का सामान’ ,अशा आशयाच्या घोषणा यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भूरसे, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष भारतजी खट्टी, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, तालुकाध्यक्ष विलासजी भांडेकर शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, अनिलजी कुनघाडकर, तालुका महामंत्री बंडू झाडे,केशव निंबोड,ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष अरुण नैताम,देवाजी लाटकर,तालुका उपाध्यक्ष मोरेश्वर भांडेकर,उराडे सर, शाम वाडई, ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, लताताई लाटकर, वैष्णवीताई नैताम, पल्लवी बारापात्रे, पुनम हेमके व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.