मुंबई – (प्रमोद तरळ) आदिवासी पाड्यातील शाळा असो किंवा इतर सामाजिक, शैक्षणिक उपक्रम असो तो राबविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या कोकण कट्टा या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कोकण कट्टा दिनदर्शिकेचे प्रकाशन सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी उप अधिष्ठाता डॉ घनश्याम अहुजा, डॉ विद्या ठाकूर, माजी आमदार गुरुनाथ देसाई, उद्योजक मनोज पाखाडे, “कोकण कट्टा” चे संस्थापक अजितदादा पितळे,सचिव सुनील वनकुंद्रे, खजिनदार सुजित कदम, दादा गावडे, मंगेश राणे,दिपेश सावंत, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.कोकण कट्टाच्या उपक्रमांची छायाचित्रे पाहून सविस्तर माहिती घेऊन डॉ जोशी यांनी कौतुक केले व असेच काम पुढे अविरत चालू ठेवावे यासाठी प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या.