रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागामध्ये हर घर संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. त्या त्या भागातील भाजप पदाधिकारी हे त्या हर घर संपर्क अभियानामध्ये सहभागी होत असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्रशासन आणि राज्यशासनाच्या विविध लाभदायक योजना या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून त्याबाबत जनजागृती केली जात आहे. संपर्क से समर्थन असा या अभियानाच्या उद्देश आहे.
रवींद्र नगर, कारवांचीवाडी, कुवारबाव परिसरामध्ये महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ. प्रियल प्रशांत जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या परिसरात हर घर संपर्क अभियान राबवले जात असून विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. मोदी शासनाच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार या अभियानाच्या माध्यमातून केला जात आहे. सौ. प्रियल प्रशांत जोशी महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांनी या परिसरातील अनेक कुटुंबीयांशी संपर्क केला असून (दक्षिण) सौ अनिता हरिश्चंद्र साळुंखे, सौ प्रज्ञा प्रकाश वारोशे, सौ शिल्पा शांताराम शितप, सौ शितल चंद्रकांत शिंदे, श्री चंद्रकांत शिंदे, सौ दिप्ती ठाकूर, सौ मनीषा शिंदे, विनायक जाधव यांसह अनेक नागरिकांशी संपर्क साधून त्यांना योजनांबाबत माहिती देण्यात आली अशी माहिती महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ प्रियल प्रशांत जोशी यांनी दिली. दखल न्यूज महाराष्ट्र..