पोलादपूर:- (प्रमोद तरळ) रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका हा अतिदुर्गम भाग येथील कातकरी आदिवासी समाजातील विद्यार्थी तसेच महिलांसाठी धैर्य सामाजिक संस्था कित्येक सामाजिक उपक्रम राबवित आहे. आज धैर्य सामाजिक संस्थेच्या विद्यार्थी दत्तक उपक्रमांतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर यांनी दिली.तसेच संस्थेच्या विद्यार्थी आणि महिला संघटक दया साळवी यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला. रानबाजिरे प्राथमिक शाळा शिक्षिका सौ नीता कोळेकर यांनी संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाबाबत संस्थेचे आभार मानले.
- Home
- रानबाजिरे आदिवासी वाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप