बातम्या

महायुतीमधील घटक पक्षाची बैठक मुंबई येथे संपन्न…

मुंबई:- (प्रमोद तरळ) आज लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुती मधील सगळे घटकपक्ष यांनी एकत्रित बसून विविध विषयावर चर्चा केली.
‌‌. महायुतीला ज्या काही जागा कमी मिळाल्या आहेत, त्याची जबाबदारी संपूर्ण महायुतीची आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्येच राहवं आणि तेच महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. आज महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. येणाऱ्या विधानसभेत महायुतीचेही नेतृत्व त्यांनीच केलं पाहिजे. आम्ही महायुतीसोबत कायम राहू आणि मोठ्या ताकदीने विधानसभेत यश प्राप्त करू, यावर एकमत झाले.
जनतेच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं महायुतीबद्दल वातावरण दूषित करण्याचं काम हे महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये केले आहे. त्यात ते यशस्वी झाले. भविष्य काळामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे घेऊन महायुती मधील घटकपक्ष मैदानात उतरणार आहेत.
‌. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना १० टक्के आरक्षण हे महायुतीने दिले, परंतु त्या यशाचे धनी मात्र महायुतीला होता आल नाही. ते यश जनतेमध्ये पोचवायला आपण कमी पडलो, यावर सविस्तर चर्चा झाली.
तसेच कांदा उत्पादक, दूध उत्पादक शेतकरी असलेल्या विभागात शेतकऱ्यांची नाराजी हे एक प्रमुख कारण कमी जागा मिळायला आहे. संविधान धोक्यात आहे, अशा पद्धतीचा अपप्रचार हा विकास आघाडीने महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणात केला. त्याचाही परिणाम महायुतीच्या जागा घटण्यावरती झाला.
महायुतीमधल्या सगळ्या घटक पक्षांनी प्रमाणिकपणाने लोकसभेमध्ये महायुतीचे काम केलं. प्रमुख नेत्यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये – जिल्ह्यामध्ये जाऊन सभा ही घेतल्या. अनेक ठिकाणी घवघवीत यश देखील प्राप्त झालं. त्या अनुषंगाने आता येणाऱ्या विधानसभेपूर्वी हे सर्व घटकपक्ष आपली भूमिका महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांच्या समोर लवकरच मांडणार आहेत.
यावेळी बैठकीस रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत, कार्याध्यक्ष दीपक भोसले, एन. डी. चौगुले, आरपीआय (आठवले गटाचे) श्री. म्हातेकर व गौतम सोनवणे, शिवसंग्रामचे तानाजी शिंदे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जयदीप कवाडे, भिमशक्तीचे अनिल कांबळे, रासपचे विठ्ठल यमकर, स्वराज्य सेनेचे श्रीहरी बागल इत्यादी उपस्थित होते.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!