राजापूर – (प्रमोद तरळ) मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या राजापुरात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून राजापुरातील दहा गावांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा फटका बसला तरी या पावसाचा टंचाईग्रस्त गावांना काहीच फायदा झाला नाही उलट टंचाईग्रस्त वाड्यांच्या संख्येत वाढ होत असून दहा गावांतील बारा वाड्यांना सध्या टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे गतवर्षी कमी प्रमाणात पडलेला पाऊस यंदा वाढलेले तापमान यामुळे नैसर्गिक जलस्त्रोत पूर्णपणे आटला असून नद्यांचे पात्र, विहिरी तलाव बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत पाणी टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील अनेक गावांत लघु बंधारे बांधण्यात आले परंतु पावसाळा संपल्यावर या बंधाऱ्यात खडखडाट असतो तालुक्यातील अनेक गावांना टंचाईची झळ बसत असून हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे सध्या तालुक्यातील दहा गावांतील बारा टंचाईग्रस्त वाड्यांना पंचायत समिती मार्फत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे त्यात ओणी- पाचलफाटा, ओझर – धनगरवाडी, वडवली – बौध्द वाडी, शिवाजी नगर, वडदहसोळ – हळदीची खांदवाडी, दोनिवडे – धनगरवाडी,कोंढयेतर्फे सौंदळ – बौध्द वाडी, तळगाव – तांबटवाडी, नवानगर अशा नऊ गावातील अकरा वाडयांचा सामावेश आहे त्यात आता हसोळ लाडवाडीची भर पडली.
- Home
- मान्सूनला विलंब, राजापूरात टंचाईग्रस्त गावांंच्या संख्येत वाढ…