गुरुपौर्णिमा निमित्त विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात आला, तसेच शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना नवीन गणवेशांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप शहराध्यक्ष मा. दादा ढेकणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे शिक्षक व शिक्षिकायांचा पुष्पगुच्छ आणि अहिल्याबाई होळकर यांचे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. शिक्षकांनी यावेळी व्यक्त केलेल्या भावना मनाला भिडणाऱ्या होत्या. नवीन गणवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "शिक्षक हा विद्यार्थ्यांचा खरा गुरू असून समाजाच्या घडणीत त्यांचे योगदान अमूल्य आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचे स्मरण व सन्मान होणे हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. शाळेच्या शिक्षिका सौ. स्नेहल पावरी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, "गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांचा अशा प्रकारे गौरव होणं, ही अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार. हा सन्मान आमच्यासाठी मोठं बळ देणारा आहे." या कार्यक्रमास राजू भाटलेकर, मनोज पाटणकर, अमित विलनकर, नितीन जाधव, संदीप सुर्वे, निलेश आखाडे, सत्यवती बोरकर, मनाली राणे, प्रज्ञा टाकळे, समीर वस्ता, नितीन गांगण, प्रीती शिंदे, वैभवी शिवलकर, मधुरा ढेकणे, विनय मसुरकर, संतोष सावंत, सचिन गांधी, भालचंद्र विलनकर, मंदार भोळे, राणे, तुषार देसाई, प्रवीण ढेकणे आदींची उपस्थिती लक्षणीय होती. भारतीय जनता पार्टी शहरतर्फे हा उपक्रम दरवर्षी अधिक मोठ्या प्रमाणात राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या उपक्रमाने शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान केला गेला. शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये असलेले शिक्षक यांचा देखील तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला.