रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण यांना नुकतीच प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाकडून मिळाली असून. मुंबई येथे मोठे शक्ती प्रदर्शन करत भारतीय जनता पार्टीने रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करत चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आ. रवींद्र चव्हाण हे डोंबिवली मतदार संघाचे आमदार असून पक्षाच्या विविध पदावर त्यांनी आजपर्यंत काम केले आहे. प्रदेशाध्यक्ष हे महत्त्वाचे पद आता रवींद्र चव्हाण यांच्याकडे असून तळ कोकणात देखील रविंद्रजी चव्हाण साहेब यांचे अभिनंदन अशा आशयाचे यांच्या अभिनंदनचे बॅनर मोठ्या प्रमाणात झळकलेले पाहायला मिळाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लक्षात घेता रत्नागिरी शहरात आणि जिल्ह्यात भाजप चांगलीच सक्रिय दिसत असून. रत्नागिरी शहरांमध्ये बॅनर लावून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलेला पाहायला मिळत असून भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये अनेक नवीन चेहरे तयार होताना दिसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपकडून नवीन चेहरे पाहायला मिळतील असे संकेत असून. पक्षश्रेष्ठी देखील कोकणात भाजप वाढवण्यासाठी आग्रही दिसत आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप वाढत असून रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष केल्याने कोकणामध्ये संघटन वाढीला मोठी गती मिळेल असे बोलले जात आहे.
