चिपळूण (ओंकार रेळेकर )
चिपळूण : येथील विश्राम गृहावर नुकतीच चिपळूण इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते एबीपी माझाचे प्रतिनिधी रविंद्र उर्फ बाळु कोकाटे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्ष पदी कोकण माझाचे प्रतिनिधी महेंद्र कासेकर व उपाध्यक्ष पदी लोकशाही चॅनलचे प्रतिनिधी निसार शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले यावेळी बैठकित सखोल विषयावर चर्चा करण्यात आली. आजच्या स्पर्धेच्या युगात पत्रकारिता करताना जोखमीचे बनले असून पत्रकारिता मधील एकी कायम टिकुन राहावी यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जय महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी राजेश जाधव, टाइम्स नाऊचे प्रतिनिधी सचिन कांबळे, लक्ष्मीकांत घोणसे पाटील (गुहागर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया) लोकशाही न्यूज प्रतिनिधी आणि IBN लोकमत प्रतिनिधी स्वप्नील घाग.(गुहागर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*