१८ डिसेंबरला मतदान, २० डिसेंबरला निकाल
मुंबई – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. संपणा-या राज्यातील ३४० तालुक्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंयतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. याममध्ये अहमदगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी,पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,सोलापूर, वर्धा,ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख तर १८ डिसेंबर २०२२ ला मतदान आणि २० डिसेंबर २०२२ ला होणार निकाल जाहीर.
होईल..
रत्नागिरी जिल्ह्यातील 165 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा समावेश यात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या. चिपळूण- ३२, दापोली-३०, गुहागर- २१, लांजा- १९, मंडणगड -१४, रत्नागिरी -२९, संगमेश्वर -३६, खेड- १०, राजापूर- ३१ अशी आहे.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*