रत्नागिरी : मा. पंतप्रधान नेरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबविलेल्या जनकल्याणकारी योजनां मधील अनेक योजना गावा-गावातील वाडी, वस्ती पर्यत पोचल्या आहेत. या योजनांचा लाभ देशातील जनतेला होत आहे. अश्या अनेक योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थीनी ‘धन्यवाद मोदीजी’ या आशयाचे पत्र या अभियानात भाग घेऊन पंतप्रधान मोदीजींच्या योजनेचा लाभ मिळाला त्या बद्दल धन्यवादाचे पत्र लिहून पाठवले.वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतलेले अनेक लाभार्थी उत्स्फूर्त पणे धन्यवाद मोदीजी आशयाचे पत्र लिहून देत आहेत.
रत्नागिरी शहर युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन यांनी पुढाकार घेत रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठ आणि आजूबाजूच्या परिसरातील लाभार्थ्यांकडून ही पत्रे जमा करून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पाठवली जाणार आहेत. यावेळी लाभार्थींनीं लिहिलेली धन्यवादाची पत्र जमा केली, लाभार्थ्यांनचे आभार मानले. रत्नागिरी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपकजी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपूर्ण रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार मार्फत राबवण्यात आलेल्या जन आरोग्य योजना, मोफत धान्य योजना, मोफत लसीकरण योजना, पंतप्रधान आवास योजना, किसान सन्मान योजना यांसारख्या असंख्य योजनांचे लाभार्थी या ठिकाणी एकत्र येत मोदीजींना सामूहिक रित्या धन्यवाद देणारे पत्र या ठिकाणी पाठवण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन रत्नागिरी शहर सरचिटणीस संदीप सुर्वे, मा.नगरसेवक राजू तोडणकर, राजीव कीर, राजन फाळके,दादा ढेकणे, नितीन जाधव, शेखर लेले, सचिन गांधी, नंदू चव्हाण, मंदार खणकार, प्रवीण देसाई, शहर अध्यक्ष सोनाली आंबेरकर, पल्लवी पाटील, संपदा तळेकर, पमु पाटील, निशांत राजपाल. आदी उपस्थित होते.
दखल न्यूज महाराष्ट्र.
