रत्नागिरी- भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबीरात राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डाॅ. राहुल मराठे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांना पथनाट्य कार्यशाळा या विषयावर मार्गदर्शन केले. डाॅ.मराठे यांनी नाट्यशास्त्राविषयी मार्गदर्शन करताना नाटक व दैनंदिन जीवन यातील परस्पर संबंध स्वयंसेवकांना समजावून सांगितला. स्वयंसेवकांना नाटकाविषयीची महत्वाची सूत्रे व बारकावे, नाटकाचे विविध प्रकार सांगितले. पुढे ते म्हणाले की नाटकातील पथनाट्य हा प्रकार सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. पथनाट्य हे जनजागृतीचे माध्यम आहे असे सांगितले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्पाधिकारी प्रा. हरेश केळकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील प्राध्यापक व स्वयंसेवक उपस्थित होते.
- Home
- पथनाट्य जनजागृतीचे माध्यम आहे- डाॅ. राहुल मराठे